मधुमेहाच्या रूग्णांसाठी 'हे' 4 योगा फायदेशीर

योगा हा आरोग्यासाठी उत्तम मार्ग आहे हे आपल्याला माहित आहे.आज जगभरात अनेक लोकं आहेत जे मधुमेहाच्या आजाराने ग्रस्त आहेत.

तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे श्वासाचे योग आणि ध्यान केल्याने शारीरिक ताणतणाव कमी होतो आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे श्वासाचे योग आणि ध्यान केल्याने शारीरिक ताणतणाव कमी होतो आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

योगासने शरीरातील लवचिकता, रक्ताभिसरण आणि झोपेची गुणवत्ता वाढवते ज्यामुळे इन्शुलिन कंट्रोल मदत होते.तुम्हालासुद्धा मधूमेहाच्या त्रास आहे का? तर करा 'ही' योगासने.

मंडूकासन

या योगासनामुळे बद्धकोष्ठता आणि पाचन समस्या सुधारण्यास मदत होते. या योगोमुळे मधुमेह नियंत्रणात राहते. मंडूकासनासाठी वज्रासनात बसा. मुठी बनवा आणि तुमच्या नाभीच्या दोन्ही बाजूली ठेवा. पुढे वाकून हलक्या हाताने नाभी 15सेकंद धरून ठेवा.

सवासन

या योगसाधनेत श्वासावर नियंत्रण केले जाते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमा होते आणि रक्तदाब कमी होण्यास मदत करते. सवासन करण्यासाठी पाठीवर झोपा , दोन्ही हात बाजूला ठेवा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा.

पवनमुक्तासन

या आसनामुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहते. हे आसन करण्यासाठी आपले डोके वर करा आणि हनुवटी किंवा नाक गुडघ्यापर्यंत स्पर्श करा. हे आसन करताना तुम्ही एक पाय दूमडून नंतर दुसऱ्या पायाने करू शकता.

भुजंगासन

भुजंगासनामध्ये पोट जमिनीला टेकवणे, त्यामुळे प्रथम जमिनीवर पालथे झोपा. हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा. हाताचे पंजे छातीजवळ आणा आणि फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story