तुम्हीदेखील प्रत्येक महिन्याला वाढणा- या बीलामुळे त्रस्त आहात तर करा 'हे' उपाय.
24°C ते 26°C हे तापमान AC साठी आदर्श मानले जाते.पण एवढच तापमान का योग्य आहे , जाणून घ्या-
वीजेची बचत- कमी तापमानात AC चालवल्याने वीजेचे बील जास्त येते त्यामुळे 24°C-26°Cच्या तापमानात AC चालवावी.
शरीरासाठी फायद्याचे- खूप थंड तापमन शरीरासाठी हानिकारक असते. 24°C-26°C तापमान शरारीला आरामदायक असते आणि झोप येण्यास सुद्धा मदत करते.
त्वचा आणि केसांसाठी फायद्याचे- जास्त थंड हवा त्वचा आणि केस रूक्ष करते. 24°C-26°C हे तापमान केसांना आणि त्वचेला निरोगी ठेवते.
रूम लवकर थंड करण्यासाठी काही टिप्स- AC लावल्यावर पंख्याचा वापर करा ज्यामुळे हवेचा प्रवाह चांगला राहतो व रूम सुद्धा लवकर थंड होते.
थंड हवा बाहेर जाऊ नये म्हणून पडद्यांचा वापर करा आणि त्यामुळे सुर्यप्रकाश देखील आत येणार नाही.
ACचा फिल्टरची नियमित साफसफाई करा.
ओवन ,स्टोव यांसारख्या उपकरणांचा कमी वापर करा यामुळे रूममध्ये उष्णता वाढते.