जपानी लोकांचं वजन का वाढत नाही?

जपानी लोक आपल्या फिटनेस आणि डाएटसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. आपल्या डाएट आणि हेल्दी लाइफस्टाइलमुळे ते फार वर्षं जगतात.

Jul 10,2023

काय आहे त्यांचं डाएट सिक्रेट?

जपानी लोक वजन वाढू नये यासाठी काटेकोरपणे काही नियमांचं पालन करतात. या टिप्स तुम्हीही फॉलो करु शकता.

जेवताना नेहमी छोटी भांडी वापरा

तुम्ही काय खात आहात याकडे कटाक्षाने लक्ष द्या. जेवताना नेहमी छोटी प्लेट, वाटी किंवा भांड्याचा वापर करा. जेणेकरुन तुम्ही खाण्याच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवू शकता.

नियंत्रित डाएट

एक नियंत्रित डाएट फॉलो करण्याचा प्रयत्न करा. जपानी लोक आपल्या डाएटमध्ये भात, मासे, भाजी, टोफू आणि सीवीडचा समावेश करतात.

अन्नाची नासाडी टाळा

अन्नाची नासाडी करु नका. जपानी लोक अन्नाचा फार आदर करतात.

छोटा घास व्यवस्थित चावून खा

जेवताना नेहमी छोटा घास घ्या आणि तो व्यवस्थित चावून खा. जेव्हा तुम्ही धीम्या गतीने जेवता तेव्हा मेंदू तुम्हाला पोट भरल्याचे संकेत देतं. ज्यामुळे तुम्ही अतीसेवन टाळू शकता.

गोड पेय टाळा

गोड पेयांच्या जागी ग्रीन टी आपल्या डाएटमध्ये सहभागी करा. यामध्ये एंटीऑक्सिडेंट्स असतात, जे मेटबॉलिजमला बूस्ट करतात आणि वजन कमी करण्यात मदत होते.

व्यायाम

दैनंदिन कार्यक्रमात शारिरीक व्यायामालाही महत्त्व द्या.

VIEW ALL

Read Next Story