भारतीय पुरुषांनी का कमी केलंय दारु पिणं? कारण एकदा वाचाच!

Pravin Dabholkar
Jan 18,2025


भारतीय पुरुषांनी दारुचं सेवन आधीच्या तुलनेत कमी कल्याचे नव्या रिपोर्टमध्ये म्हटलंय.


2015 आणि 1998 च्या तुलनेत भारतीय पुरुष कमी दारु पितायत. जवळजवळ सर्वच राज्यांमध्ये हे चित्र दिसतंय.


भारतीय पुरुषांच्या दारु पिण्याच्या सवयीत का बदल झालाय? जाणून घेऊया.


यकृत, कॅन्सर आणि मानसिक आरोग्याचा धोका याबद्दल जनजागृती झाली आहे. त्यामुळे लोकांचं दारु पिण्याचं प्रमाण कमी झालंय.


आधी दारु पिण्याला फॅशन किंवा सोशल स्टेटस म्हटलं जायचं. पण आता लोकं त्याकडे सकारात्मकदृष्टीने पाहतात.


अनेक राज्यात दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई होते. तर गुजरात, बिहारमध्ये यावर बंदी आहे. हेदेखील दारु कमी पिण्याचं एक कारण असू शकतं.


युवा पिढी आता फिटनेसवर लक्ष केंद्रीत करतेय. त्यामुळे दारुऐवजी एनर्जी ड्रींक पिण्याकडे त्यांचा कल असतो.


दारु, सिगारेट अशा आरोग्यघातक गोष्टींवर भरमसाठ टॅक्स असतो. त्यामुळे त्या दिवसेंदिवस महाग होताना दिसताय. बजेटच्या दृष्टीकोनातूनही भारतीय पुरुष विचार करायला लागले आहेत.


एकदम दारु सोडण्याऐवजी मेडीटेशन करुन स्वत:च्या मनाची तयारी करा.


मेडिटेशन आणि डिप ब्रिदींग एक्सरसाइजने डोकं शांत राहू शकतं. यामुळे दारुची तलप कमी करता येऊ शकते.

VIEW ALL

Read Next Story