महिलांना दर महिन्यात का येते मासिक पाळी?

Sep 16,2024

मासिक पाळी

वयाच्या एका टप्प्यानंतर प्रत्येक महिलेला मासिक पाळीच्या चक्रातून पुढे जावं लागतं.

हार्मोन्स

मासिक पाळी मुळातच शरीरातील हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे येते.

गर्भधारणा

एक प्रकारे या प्रक्रियेतून महिलेचं शरीर गर्भधारणेसाठी सक्षम होत असतं.

स्त्रीबीज

योग्य काळात स्त्री आणि पुरूषाच्या वीर्यातील पुरूषबीज आणि स्त्रीच्या गर्भाशयातील स्त्रीबीज यांच्या संयोगातून गर्भ तयार होतो.

प्रक्रिया

ज्यावेळी हे स्त्रीबीज फलित होत नाही त्यावेळेस फलित न झालेल्या बिजासहित आच्छादन शरीर बाहेर टाकतं.

मासिक पाळी समजून घेताना...

हेच अच्छादन रक्ताच्या स्वरूपात योनी मार्गाद्वारे बाहेर उत्सर्जित होतं आणि म्हणून मासिक पाळीदरम्यान रक्तस्राव होतो. ही प्रक्रिया दर महिन्याला किंवा ठराविक दिवसांच्या कालावधीत पार पडते.

VIEW ALL

Read Next Story