अंडं हे प्रोटीनचा सर्वोत्तम स्रोत म्हणून ओळखलं जातं.
अंड्यांचं सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
उकडण्याऐवजी ऑमलेट बनवूनही अनेकजण अंड्याचं सेवन करतात.
मात्र ऑमलेटऐवजी उकडलेली अंडी ही आरोग्यासाठी जास्त फायद्याची असतात.
हिवाळ्यामध्ये उकडलेली अंडी खाण्याचे अनेक फायदे होतात.
अंड्यामधील प्रोटीन रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
उकडलेली अंडी खाल्ल्याने 'व्हीटॅमिन डी'ची कमतरता भरुन निघते.
उकडलेली अंडी खाल्ल्याने केस गळतीची समस्याही कमी होते.
उकडलेल्या अंड्यांचं सेवन केल्याने हाडं मजबूत होण्यास मदत होते.
बी 12 ची गरज पूर्ण करण्यासाठी उकडलेली अंडी खाणं फायद्याचं असतं.
सदर माहिती सामन्य ज्ञानावर आधारित आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आहारामध्ये बदल करावेत.