युरीक अॅसिडचे प्रमाण वाढल्याने सांधेदुखी, वेदना ,सूज आणि हाडे कडक होताना दिसून येतं
शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्यास ते आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतं.
साधारणत: सगळ्याच शरीरांमध्ये युरिक अॅसिड असतं पण ते योग्य प्रमाणात असणे गरजेचं असतं.
महिलांमध्ये 2.5 ते 6 mg/dL तर पुरूषांमध्ये 3.5 ते 7 mg/dL युरिक अॅसिडचे प्रमाण नॉर्मल मानले जाते.
पण जर युरिक अॅसिडचे प्रमाण 9-10mg/dL एवढं प्रमाण झाल्यास रक्तामध्ये दीर्घकाळापर्यंत राहिल्यानं सांध्यांमध्ये क्रिस्टलप्रमाणे जमा होतं या कारणामुळे हाडे ठिसूळ होतात आणि सांध्यांमध्ये वेदना आणि सूज येण्यास सुरुवात होते.
खूप वेळापर्यंत युरिक अॅसिड कंट्रोलमध्ये आलं नाही तर त्याचं रुपांतर गाठींमध्ये होतं. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)