योगा करण्याआधी व नंतर काय खावे?

भारतीय संस्कृतीमध्ये योगाचे अनन्यसाधारण महत्व सांगितले आहे. निरोगी आयुष्यासोबतच योगा ताणतणावापासून सुद्धा दूर ठेवते.

योगा करण्याआधी संतुलित आहार घेणे गरजेचे असते. जर तुम्ही सुद्धा योगा करत असाल तर या आहाराचा समावेश नक्की करा.

योगा कपण्याआधी काय खायला हवे

उपाशीपोटी योगा करणे टाळावे. जर तुम्ही सकाळी योगा करत असाल तर एखाद केळ किंवा जांभूळ खाणे फायदेशीर असते. संध्याकाळी योगा करत असल्यास भिजवलेले कडधान्य किंवा सॅलड खावे.

चहा घेणे टाळावे

योगा करण्याआधी चहाचे सेवन करू नये. चहा शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करते त्यामुळे डीहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो.

भरपूर पाणी प्या

योगा करण्याआधी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. रिकाम्यापोटी योगा करणे घातक ठरू शकते.

योगा करण्याआधी दही,फळं, सॅलड, कडधान्य , फळांचा ज्युस, रताळे खावे.

योगासनानंतर काय खावे

योगासनानंतर लगेच काही खाऊ नये.जवळपास 30मीनिटे काही खाणे टाळावे. त्यानंतर शरीराला कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन मिळेल अशा पदार्थांचं सेवन करावं.

योगासनानंतर लगेच पाणी पिऊ नये

योगासनानंतर लगेच पाणी पिणे टाळावे असे केल्याने पोटात क्रॅम्स येऊ शकतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story