मुघल साम्राज्यावेळी त्यांच्या हरमीच खूप चर्चा असायची.
देशासह विदेशातील लोकंही येथे येऊन हरमबद्दल जाणून घ्यायची.
मुघल बादशाह बाबर हा हरमला घेऊन आलेला पहिला बादशाह होता, असे म्हटले जाते.
हरम हा अरबी शब्द असून याचा अर्थ पवित्र आणि वर्जित असा होतो.
मुघल हरममध्ये महिलांना स्थान दिले जायचे.
यामध्ये शाही परिवारातील महिला, वैश्या, जिंकलेल्या महिला असायच्या. महिलाच हरम संभाळायच्या.
हरममध्ये गेल्यावर बाहेरच्या दुनियेशी संबंध तुटायचा. या नियमाचे पालन करावे लागायचे.
हरममध्ये शाही महिलांसाठी रोज वेगवेगळे नवीन कपडे यायचे. त्यांचा थाट राजेशाही असायचा.
तिरंदाजी करणे, गझल ऐकणे हे शाही महिलांचे आवडते छंद होते.