ओठ आपल्या सौंदर्यात फक्त भर पाडत नाही तर, त्यांच्या बदलत्या रंगांमुळे अंतर्गत आरोग्याची स्थितीही दिसून येते.
ओठांच्या रंगात अचानक बदल होत असल्यास तर चुकूनही त्याकडे दुर्लक्ष करू नका.
चला तर मग जाणून घेऊया ओठांचा कोणता रंग कोणत्या आजाराचे लक्षण आहे.
लाल रंगाचे ओठ यकृताशी संबंधित आजार दर्शवतात. याशिवाय लाल रंगाचे ओठ हे देखील ऍलर्जीचे लक्षण असू शकतात.
जर एखाद्याचे ओठ अचानक पांढरे होऊ लागले तर याचा अर्थ त्या व्यक्तीला रक्ताची कमतरता किंवा अशक्तपणाची समस्या आहे.
ओठांचा जांभळा रंग धुम्रपानामुळे असे होत आहे असे समजून ते त्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु काहीवेळा हे फुफ्फुसाशी संबंधित आजारांचे लक्षण असते.
ओठांचा पिवळा रंग पचनाशी संबंधित समस्यांमुळे होतो. ओठांचा रंग बराच काळ पिवळा राहिल्यास डॉक्टरांकडे आवर्जून जा.
जर तुमचे ओठ अचानक डार्क गुलाबी झाले असतील, तसेच तुम्हाला दोन्ही हात आणि पायांना थंडी जाणवू लागली असेल तर हे शरीरात लोहाच्या कमतरतेचे लक्षण आहे.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)