तुम्हाला माहित आहे का जर तुमची नखं पिवळी पडत असतीस तर तुम्हाला गंभीर आजार असण्याची शक्यता आहे. जाणून घ्या काय आहेत यलो नेल सिंड्रोमची लक्षणे.
बऱ्याचवेळा तीव्र सूर्यप्रकाश , धूळ आणि घाण यामुळे त्वचा खराब होऊ नये म्हणून काळजी घेत असतो. अशा परिस्थितीत आपण हाताच्या आणि पायांच्या नखांकडे दूर्लक्ष करतो.
तज्ज्ञांच्या मते, नखांकडे दूर्लक्ष करणं महागात पडू शकतं. कारण नखं आरोग्याशी संबंधित अनेत समस्या दर्शवते.
यलो नेल सिंड्रोम हा एक दूर्मिळ आजार आहे ज्यामध्ये फुफ्फुस आणि इतर अवयवासंबंधित आजार होण्याची शक्यता असते.
यलो नेल सिंड्रोममुळे नखं पिवळी आणि थोड्या प्रमाणात वाकलेली दिसू लागतात.
नारायणा हॉस्पिटलचे इंटर्नल मेडिसिन डॉक्टर पंकज वर्मा यांच्या मते, यलो नेल सिंड्रोम हे संभाव्य अनुवांशिक स्थिती दर्शवते.अद्याप त्यामागील योग्य कारण समजलेलं नाही.
यलो नेल सिंड्रोममुळे क्रॉनिक ब्रॉकायटिस, सायनुसायटिस, फुफ्फुसाभोवती द्रव साठणे यांसारख्या श्वसनाच्या समस्या उद्भवतात.
नखे पिवळी किंवा हिरवी होणे, नखाभोवती फुगवटा तयार होणे, नखांची हळू वाढ, खोकला, सांधे दुखी आणि पायांना सूज याप्रकारची लक्षणे यलो नेल सिंड्रोममध्ये दिसून येतात.