वजन मोजण्याची योग्य वेळ आणि पद्धत समजून घ्या

अनेकदा आपण वजन करण्यासाठी मशीनचा वापर करतो. मशीनवर दिसणारा वजनाचा आकडा पाहून अनेकांच्या कपाळावर आट्या येतात. मग यानंतर डाएटसारखे कार्यक्रम सुरु होतात.

दिवसातून कधीही वजन करणं चुकीचं

पण अनेक लोक दिवसातून कोणत्याही वेळी वजन करतात. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण जर तुम्हाला योग्य वजन कळलं नाही तर इतरही गोष्टींमध्येही गडबड होऊ शकते.

योग्य वेळी वजन मोजा

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, वजन मोजण्यासाठी एक योग्य वेळ असते. त्याचवेळी वजन मोजणं सर्वात जास्त योग्य आहे.

ब्लॅडर रिकामं करा

सायन्स सांगतं की, वजन करण्याआधी ब्लॅडर रिकामं करणं गरजेचं आहे. अन्यथा युरिनचं वजनही तुमच्या वजनात गणलं जातं. यामुळे वजन कऱण्याआधी मूत्रविसर्जन करुन घ्या.

पोट रिकामं ठेवा

वजन करताना पोट रिकामं ठेवा. वजन करण्याआधी पाणी, औषध, चहा. कॉफी यांचं सेवन करु नका.

वजनात 500 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत बदल होतो

प्रत्येकाच्या वजनात 500 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत बदल होत असतात. त्यामुळे तितका अंदाज ठेवा

वजन मोजण्यासाठी योग्य वेळ कोणती?

दिवसभराच्या हालचाली, व्यायम यामुळे संध्याकाळी वजन केलं तर ते कमीच येणार. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी वजन करणं सर्वात योग्य वेळ आहे.

सकाळी वजन मोजण्याचं कारण?

सकाळी आपलं पोट रिकामी असतं त्यामुळे ती वजन मोजण्यासाठी सर्वात योग्य वेळ आहे. याउलट संध्याकाळपर्यंत आपण 2 ते 3 वेळा काहीतरी खाल्लेलं असतं, पाणी प्यायलेलं असतं जे वजनात मोजलं जातं.

वजन किती वेळा मोजावं?

महिन्यातून एकदा वजन मोजत असाल तर ते पुरेसं आहे. रोज वजन मोजण्याची गरज नाही.

वजनात रोज बदल का होतो?

आपलं वजन हे आपण आदल्या दिवशी काय खाल्लं होतं, किती पाणी प्यायलं होतं. कोणतं औषध घेतलं होतं, किती व्यायाम केला होता यावर अवलंबून असतं.

VIEW ALL

Read Next Story