शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी फळं आणि भाज्यांचा बिया या अतिशय चांगल्या असतात.
तुम्ही जर रोज रात्री Flaxseed म्हणजे अंबाडीच्या बियाच पाणी प्यायल्यास शरीराला फायदा मिळतो.
अंबाडीच्या बियांमध्ये अँटी - ऑक्सिडंट्स, फायबर, प्रोटीन, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आणि ओमेगा-3 सारखे पोषक घटक मिळतात.
तुम्ही रोज रात्री अंबाडीच्या बियांचं पाणी प्यायल्यास वजन कमी करण्यास मदत मिळते. अतिरिक्त चरबी कमी करण्यास फायदा होता.
कोलेस्टेरॉल नियंत्रण ठेवण्यास ओमेगा -3, फॅटी अॅसिड आणि इतर पोषक घटक असतं जे कोलेस्टेरॉल कमी करण्यास फायदेशीर ठरतं.
नियमित अंबाडी बियाचं पाणी प्यायल्यास हृदय निरोगी राहतं आणि रक्तदाब नियंत्रणात राहतं.
अँटी ऑक्सिडंस्ट घटक असल्याने त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते.
मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)