कधी-कधी आपल्याला एकटेपणा जाणवत असतो. अशावेळी एकटेपणा दूर करण्यासाठी काय केले पाहिजे हे आपल्याला समजत नाही.
सतत मन अशांत असल्याने तणाव वाढू लागतो. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे तुमच मन शांत आणि एकाग्र करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहीजे. तुम्ही तुमच्या आवडिचे पुस्तक वाचा. पुस्तक वाचल्याने मन एकाग्र होण्यास मदत होते. सकाळी लवकर उठून योगासन करा.
एकटेपणा दूर करण्यासाठी मित्रमैत्रिणींना भेटणं, त्यांच्यासोबत गप्पा मारणे, बाहेर फिरायला जाणे यामुळे एकटेपणा आणि तणाव दूर करण्यास मदत होते.
जेव्हा तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल तेव्हा तुमच्या परिवारासोबत वेळ घालवायला पाहिजे. कोणत्या अडचणी तुमच्या आयुष्यात निर्माण झाल्या असतील तर त्याबद्दल तुम्ही तुमच्या परिवारासोबत, मित्रांसोबत चर्चा करा.
तुम्ही खाली वेळेमध्ये तुमच्या आवडिच काम करत रहा. तुमचे छंद जोपासा.
तुमच्या सभोवतालच्या वातावरणात बदल करणे गरजेचं आहे. जोपर्यंत तो बदल होणार नाही तो पर्यंत तुम्ही एकटेपणा दूर करु शकत नाही.
एकटेपणा दूर करण्यासाठी तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक चित्रपट पाहणे, गाणे ऐकणे, आवडत्या ठीकाणी फिरायला जाणे अश्या गोष्टी करुन तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करु शकता.