लिपस्टिकमुळे महिलांचे ओठ सुंदर दिसतात. त्यामुळे लिपस्टिकशिवाय त्यांचा कोणताच मेकअप पूर्ण होत नाही.
लिपस्टिक लावल्याने कोणते आजार होऊ शकतात लखनौचे वरिष्ठ सल्लागार डर्मिटोलॉजिस्ट डॉ. देवेश मिश्रा यांनी दिली आहे.
इतर प्रोडक्टप्रमाणे लिपस्टिकमध्येही अनेक प्रकारचे केमिकल्स असतात. यामुळे ओठांचं नुकसान होतं. अशावेळी रोज लिपस्टिक लावणे टाळावे.
काही महिला स्वस्त मिळते म्हणून नॉन ब्रॅण्डेट लिपस्टिक घेतात. अशा लिपस्टिकमध्ये लेड असते जे शरीरासाठी घातक असतं. लिपस्टिकमुळे होणाऱ्या आजारांबद्दल जाणून घेऊया.
लिपस्टिकमध्ये असलेल्या केमिकल्समुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो. अशावेळी नैसर्गिक पदार्थांनी बनलेली लिपस्टिक वापरावी.
रोज लिपस्टिक वापरलात तर ओठांच्या स्किनवर एलर्जी होऊ शकते. लिपस्टिकचे केमिकल खाण्यापिण्यातून पोटात जाते. याने रॅशेस, सूज आणि खाज येते.
लिपस्टिक पोटात गेल्यास पचन क्रियेवर परिणाम करते. यामुळे पोटदुखी, क्रॅम्प आणि अल्सरसारखे त्रास जाणवतात.