वेगवेगळ्या कारणाने डोके दुखीचा त्रास होता. पण तुमचं डोकं नेमकं कशामुळे दुखतंय हे समजून घेणं महत्त्वाच आहे.
शिवाय डोके दुखीची काही लक्षणं धोक्याची घंटा असते त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नसतं.
आम्लपित्त (गॅस), बीपी, साखरेचे चढउतार, बद्धकोष्ठता, सायनस इन्फेक्शन, सर्दी, तणाव, डिहायड्रेशन, दृष्टी समस्या, हार्मोनल समस्या, मायग्रेन, डोके दुखापत आणि सेंट्रल नर्वस सिस्टम (CNS) संक्रमण यासारखी डोकेदुखी होण्याची अनेक कारणं असतात.
डोकेदुखीचे खरं कारण हे सीटी स्कॅन, एमआरआय किंवा काही विशिष्ट रक्त चाचण्यांद्वारे लावण्यात येतं.
तर झोपेत डोकेदुखी वाढली, सकाळी डोकेदुखी जास्त असेल, दररोज डोकेदुखीची वारंवारता वाढली, डोक्याची हालचाल झाल्या त्रास ही धोक्याची घंटा असते.
तीव्र ताप तसंच मानेची हालचाल झाल्यास डोकेदुखी झाल्यास, उलट्या होणं, चेतना नष्ट झाल्यास, आळस वाटणे, डोक्याला दुखापत झाल्यानंतर डोकेदुखी वाढली आणि दृष्टी अस्पष्ट, मंद दृष्टी जाणवल्यास डॉक्टरांशी संपर्क करावा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)