जर तुम्ही पुरेसा आणि पोषक आहार घेत नसाल तर तुमच्या शरीरात अशक्तपणा जाणवू लागतो तसेच रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा कमकुवत होते. जर शरीरात लोहाची कमतरता असेल तर एनिमियाचा धोका वाढू शकतो. आरोग्यजज्ज्ञ याबद्दल काय सांगतात हे जाणून घेऊयात
जेव्हा शरीरात रक्ताची कमतरता म्हणजेच हिमोग्लोबिन कमी प्रमाणात असेल तेव्हा एनिमियाचा अजार उद्भवतो. अशात, शरीरातील भागांमध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सीजन पोहोचत नाही.
एनिमियामुळे डोळ्यातील पांढरा भाग म्हणजेच कंजक्टिवा मध्ये पिवळेपणा दिसू लागतो. हे पिवळेपण शरीरात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन नसल्याने होतं.
जर तुम्हाला एनिमियासोबत कावीळ असेल तर डोळ्यातील पिवळ्या भागाबरोबर त्वचासुद्धा पिवळी दिसू लागते. यामुळे शरीरातील बिलीरुबिनचे प्रमाण वाढून रक्ताचे प्रमाण कमी होते.
रक्ताच्या कमतरतेमुळे डोळ्यातील अश्रू बनवणाऱ्या ग्रंथींवर वाईट परिणाम होतो. यामुळे डोळ्यात कोरडेपणा आणि जळजळीच्या समस्येची शक्यता असते.
डोळ्यातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे डोळ्यातील पेशी नीट कार्य करु शकत नाहीत. यामुळे अस्पष्ट दिसण्याची समस्या उद्भवते.
अधित काळापर्यंत एनिमियावर उपचार न केल्याने डोळ्यातील नसांवर दबाव पडतो. यामुळे डोळ्यातील नसा रुंद होऊन डोळ्यात लालसरपणा दिसतो.
एनिमियाचा दृष्टीवर वाईट परिणाम पाहायला मिळतो. यामुळे डोळ्यांच्या बघण्याची क्षमता कमी होऊन धूसर दिसण्याची शक्यता वाढते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)