आयुर्वेदानुसार, पित्त, कफ आणि वात हे अनेक समस्यांचे मूळ मानले जाते. त्यामुळे जेवणाचे नियम सांगितले आहेत.
वेळेवर जेवणं, घास चावून खाणे, जेवल्यानंतर शतपावली करणं तसेच ऋतूनुसार आहारात बदल करणे हे आयुर्वेदात सांगितलेले काही नियम आहेत.
आयुर्वेदिक तज्ज्ञांनुसार, जेवणाआधी हाताबरोबर पाय धुतल्याने शरीरातील ऊर्जा नियंत्रित राहते.
पाय धुतल्याने शरीरातील ऊर्जा नियंत्रित राहिल्यामुळे पचनाला मदत आणि शरीराला पोषक तत्वे मिळतात.
जेवणाआधी किमान 40 मिनिटांपूर्वी पाणी प्यावं. जेणेकरुन आपल्या शरीरातील टॉक्सिन बाहेर निघून जातं.
जेवल्यानंतर आंघोळ, लगेच पाणी पिणं, झोपणं, आणि बसून राहणं अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत.