मैदानात विराट कोहली नेहमीच आक्रमक रुपात दिसतो. पण मैदानाबाहेर मात्र तो एक चागंला सहकारी आणि मित्र आहे.

Apr 25,2024


आपल्या ज्युनिअर खेळाडूंसाठी तो नेहमीच मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतो. विराटच्या याच स्वभामामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आहे.


विराट कोहलीने आपली आवडती बॅट कोलकाताचा युवा फलंदाज रिंकू सिंगला भेट दिली आहे. याआधीही विराटने रिंकूला बॅट गिफ्ट केली होती.


पण रिंकूला दुसरी बॅट सहज मिळाली नाही. यासाठी त्याला विराट कोहलीच्या मागे हट्ट धरावा लागला.


विराट आणि रिंकूचा याआधी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात रिंकू पहिली दिलेली बॅट तुटल्याचं सांगताना दिसतोय. यावर विराट त्याच्यावर रागावतो.


पण रिंकू मागे हटला नाही. त्याने आता बॅट तोडणार नाही अशी विराट समोर शपथ घेतली. अखेर विराटने रिंकूला एक बॅट भेट म्हणून दिली.


बॅट गिफ्ट मिळाल्यानंतर रिंकू सिंगचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अखेर विराटकडून बॅट मिळवलीच असं या व्हिडिओत तो सांगताना दिसतोय.

VIEW ALL

Read Next Story