हाडे मजबूत राहण्यासाठी शरिरात कॅल्शिअमची योग्य मात्रा असणे आवश्यक आहे.
खराब लाईफस्टाइल आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे कॅल्शियमची पूर्तता होत नाही.
अशा पदार्थांबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे ऐन तारुण्यात तुम्हाला वृद्धत्वाची लक्षणे दिसतील.
हे पदार्थ तुमच्या शरिरातून कॅल्शियम खेचून घेतात आणि हाडांना कमजोर बनवतात.
कॅफीनचे सेवन जास्त केल्यास शरिरात कॅल्शियमची कमी जाणवते.
दारु पिणं आरोग्यासोबत हाडांसाठी देखील नुकसानदायक आहे.
रोज बर्गर, फ्राइड फूडसारखे अनहेल्दी पदार्थ खात असाल तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
कोल्ड्रींग्स पिणे हाडांसाठी चांगले नसते. ते यातून कॅल्शियम शोषून घेतात.
जास्त मीठ खाल्ल्यास शरिरातील कॅल्शियम कमी होते.