अंड खाणं आरोग्यासाठी हेल्थी मानलं जातं. अंड्याच्या विविध डिश बनवल्या जातात.
शाकाहारी असणारे अंड खात नाहीत त्यांच्या मते अंड हे मांसाहार श्रेणीत येतं.
तर काही लोकांचं म्हणणं आहे की अंड हे मांसाहारी नाही, तर शाकाहारी श्रेणीत मोडतं
अंड हे पक्षाचं असल्याने ते मांसाहार श्रेणीत येत असल्याचं मानलं जातं. पण खरंच अंड खाणं मासाहारी आहे का?
परिभाषेनुसार असा कोणताही पदार्थ ज्यात प्राणी किंवा पक्षाचं मांस किंवा टिश्यू नाही, तो पदार्थ शाकाहारी असतो.
अंड्यात या दोन्ही गोष्टींचा समावेश नसतो. अंड खाण्यासाठी कोंबडीला मारलं जात नाही. त्यामुळे अंड हे शाकाहारी श्रेणीत येतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे
अंड्याच्या सफेद भागात मासाचे अंश नाहीत. पण काही श्रेणीत अंड मांसाहारी देखील असू शकतं.
कारण अंड्यात असलेलं पिवळं बलक हे रिप्रोडक्टिव्ह सेल असतं. म्हणजे पिवळ्या भागाचं जेव्हा जीवात रुपांत होऊ लागते तेव्हा ते नॉनव्हेज बनतं
बाजार विक्रीसाठी असणारी अंडी ही अनफर्टीलाइज्ड म्हणजे त्यातून पिल्लं जन्माला येऊ शकत नाहीत. म्हणू ती व्हेज असल्याचं तज्ज्ञ म्हणतात.
पण काही अंडी याला अपवाद असतात, विक्रीला असणाऱ्या काही अंड्यांमधून पिल्लं जन्मला आल्याचे प्रकार घडले आहेत.