'हे' 10 Bollywood Stars दारुच्या थेंबालाही शिवत नाहीत; सर्वच नावं थक्क करणारी

आमीर खान

मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला आमीर खान मद्यपान करत नाही. आमीर मद्याच्या थेंबालाही हात लावत नाही.

विद्या बालन

अभिनेत्री विद्या बालनही मद्यप्राशन करत नाही. विद्या आरोग्यदायी आयुष्य जगण्यास प्राधान्य देते.

सोनू सूद

कोरोना काळातील समाजसेवेसाठी ओळखला जाणारा अभिनेता सोनू सूद हा नकारात्मक भूमिका साकारतो. मात्र खऱ्या आयुष्यात तो दारुच्या थेंबालाही शिवत नाही.

अक्षय कुमार

अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या हेल्दी लाईफस्टाइलसाठी ओळखला जातो. अक्षय कुमारने अनेकदा आपण मद्यप्राशन करत नाही याबद्दल भाष्य केलं आहे.

क्रिती सेनॉन

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री क्रिती सेनॉनही मद्यपानापासून दूरच असते. ती दारुच्या थेंबालाही स्पर्श करत नाही.

राजकुमार राव

आपल्या वेगळ्या भूमिकांमुळे चर्चेत असलेला अभिनेता राजकुमार रावही मद्यपान करत नाही.

कटरिना कैफ

बॉलिवूड डिव्हा कटरिना कैफही मद्यपान करत नाही.

ऋतिक रोशन

ग्रीक गॉड नावाने ओळखला जाणारा अभिनेता ऋतिक रोशन त्याच्या शरीरयष्टीसाठी ओळखला जातो. ऋतिकही मद्यापासून चार हात दूरच असतो.

आयुषमान खुराना

अभिनेता आयुषमान खुराना दारुला हात लावत नाही. अनेक चित्रपटांमध्ये मद्यपान करणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारणारा आयुषमान निर्व्यसनी आहे.

तापसी पन्नू

'थप्पड' आणि 'पिंक'सारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारी अभिनेत्री तापसी पन्नूही मद्यप्राशन करत नाही.

VIEW ALL

Read Next Story