सकाळी मोड आलेले हिरवे मूग खा अन् फिट व हेल्दी राहा

मोड आलेले मूगात प्रोटिन असते. मुगात अमीनो अॅसिड, अँटीऑक्सिडेंट्स आणि आवश्यक पोषक तत्वे असतात.

Mansi kshirsagar
Nov 07,2023


मोड आलेल्या मुगात प्रोटियोलिटिक एंजाइम असतात ज्यामुळं कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनची मात्रा जास्त असते.


मुग खाल्ल्याने शरीरात क्लोरिफिलसोबत अँटिऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन सीची मात्रा वाढवते. ज्यामुळं रोगप्रतिकार शक्ती वाढवते व शरीराला डिटॉक्सीफाय करण्यास मदत करते.


मोड आलेले मुग पचायला हलके असतात त्याचबरोबर यात खूप सारे एन्झायम असतात ज्यामुळं पाचनसंस्था निरोगी राहते.


मोड आलेल्या मुगात कॅलरीची प्रमाण खूप कमी असते आणि फायबर जास्त प्रमाणात असतात. त्यामुळं वजन कमी करणाऱ्यांसाठी मुग खूप चांगला पर्याय आहे.


मोड आलेले मुग खाल्ल्यास पोटेशियमचा चांगला स्त्रोत असतो. ज्यामुळं ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत होते.


मोड आलेल्या मुगात भरपूर प्रमाणात लोह असते ज्यामुळं हिमोग्लोबीनची मात्रा वाढते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story