आपल्या लाइफस्टाईलचा थेट परिणाम केसांवर होतो. अशात केस गळण्यापासून अनेक समस्या निर्माण होतात.
केसांना निरोगी ठेवण्यासाठी आणि ते गळण्यापासून रोखण्यासाठी लोक अनेक उत्पादनं वापरतात. तरीही त्यांची केसगळती कमी होत नाही.
जर तुम्हालाही अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्हीसुध्दा या घरगुती उपायांचा वापर करू शकता. ज्यामुळे तुमचे केस दाट आणि मजबूत होण्यास मदत होईल.
आवळा आणि लिंबू यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी केसांच्या वाढीस खुप उपयुक्त ठरतात.
हे हेअर मास्क लावल्यानं केसांवर चमक आणि संपूर्ण पोषण मिळते.
मेथीचा मास्क केसांसाठी खूप उपयुक्त असतो. याचा वापर केल्यानं डोक्यातील कोंडा आणि टाळूची खाज कमी होऊ लागते.
पोषक आणि निरोगी असलेले आव्होकाडो हे हेअर मास्क म्हणून केसांच्या वाढीसाठी चांगले असते.
केसांना कडुलिंबाचा मास्क लावल्याने कोंडा आणि केसगळती कमी करता येते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)