रात्री उशिरा जेवण केल्यामुळे व्यक्तीला रक्तदाबाची समस्या आणि मधुमेहाचा आजार होण्याची संभावना असते. त्यामुळं रात्रीच्या जेवणात कोणते पदार्थ खाऊ नयेत, याबाबत जाणून घ्या.
गव्हाप्रमाणेच मैदा देखील जड असतो. त्यामुळे तो पचायला जास्त वेळ लागतो. अशा परिस्थितीत जड अन्न शरीरात अमा (विषाक्त पदार्थ) निर्माण करण्याचे काम करू शकतात.
सॅलड्स आरोग्यासाठी खूप चांगले असतात, परंतु कच्चे सॅलड विशेषतः थंड आणि कोरडे असतात. जर तुम्हाला सॅलडमधील पौष्टिक गुण पूर्णपणे आत्मसात करायचे असतील तर ते शिजवून खाणे हा एक आरोग्यदायी व स्वादिष्ट पर्याय आहे.
राजमामध्ये आयर्न, कॉपर, फोलेट, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक तत्व उपलब्ध असतात. हा पदार्थ एकंदर एवढा फायदेशीर असून सुद्धा रात्री न खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण यात असलेले फायबर वेदनादायी गॅस तयार करतात.
ब्रोकलीमध्ये असलेले फायबर पचण्यास खूप जास्त वेळ लागतो आणि यामुळेच तुमची सतत झोपमोड होऊ शकते. अनेकदा तर ब्रोकली रात्रीच्या जेवणात खाल्ल्याने सकाळी हमखास गॅस वा अॅसिडीटीची समस्या होते.
टॉमेटो खाल्ल्याने तुमच्या झोपेवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. हे एक प्रकारचे अमिनो अॅसिड आहे जे तुमच्या मेंदुंच्या गतीविधी वाढवते आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला झोप ही उशिरा येते.
वांगीत अमिनो अॅसिड असलेल्या टायरामाइनची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. तुम्ही सुद्धा रात्री वांगी खात असाल आणि झोपेची समस्या निर्माण होत असेल तर ही गोष्ट लवकरात लवकर बदला.
उन्हाळ्यात किंवा दिवसा कधीही तुम्ही काकडी खाल्लेली चांगली आहे. पण रात्री जर तुम्ही काकडी खात असाल तर यामुळे नक्कीच तुमच्या झोपेत अडथळा हा येणारच आहे. शिवाय यामुळे पोट फुगण्याचा त्रास होतो.
फ्लॉवर भाजीचे झोपण्यापूर्वी त्याचे सेवन करू नये. या भाज्या चांगली झोप लागण्याच्या क्षमतेत व्यत्यय आणू शकतात. कारण तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करत असता पण त्यात असलेले फायबर पचत असल्याने झोपेत अडथळा येतो.
दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण ते रात्री खाऊ नये. त्याचा प्रभाव गरम असतो आणि ते पचायलाही वेळ लागतो. यामुळे तुम्हाला रात्रभर अस्वस्थ वाटू शकते.