उन्हाळ्यापासून आराम मिळण्यासाठी लोक ताकाचं सेवन करतात. ताक पोटाला थंडावा देते पण तुम्हाला माहित आहे का काहीं लोकांसाठी ताक धोकादायक ठरू शकते.
प्रसिद्घ आहारतज्ञ आयुषी यादव यांनी सांगितले की, किडनीचा त्रास असलेल्यांनी ताक पिऊ नये.
ज्या लोकांना दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी आहे त्यांनी देखील याचा समावेश टाळावा.
उच्च रक्तदाब असलेल्यांनीही याचे सेवन सावधगिरीने करावे.
जर तुम्हाला ताप येत असेल तर तुम्ही ताकाचे सेवन टाळण्याचा प्रयत्न करावा.
सांधे दुखीचा त्रास असलेल्या लोकांनीही ताकाचे सेवन करू नये.