पावासाळ्यातील रोगराईमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. म्हणूनच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात 'ही' पेय फायदेशीर ठरतात.
'दालचिनी', 'वेलची', 'लवंग'',गवती', 'चहा' आणि 'आलं' एकत्र करुन केलेला मसाला चहा पावसाळ्यात आरोग्यवर्धक मानला जातो.
हळद पावसाळ्यातील आजारांना लांब ठेवण्यासाठी मदत करते. रोज रात्री झोपण्यापुर्वी 'हळदीचं दूध' प्यायल्याने खोकला दूर होण्यास मदत होते.
काश्मीरचा कहावा जगभरात लोकप्रिय आहे. 'ग्रीन टी'ची पानं, 'केशर', 'बदाम' एकत्र करुन केलेला हा कहावा पावसाळ्यात शरीरात उष्णता निर्माण केली.
तुळशीमध्ये असलेले औषधी गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. 'तुळशीचा काढा' प्यायल्याने खोकला आणि सर्दी दूर होते.
दूधात बदामाची पूड टाकून प्यायल्याने शरीराला प्रोटीन मिळतात.
सकाळी उठल्यावर 'लिंबू पाणी' प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्याने ताप, खोकला यांसारखे आजार दूर होतात.