महाराष्ट्रातील नद्यांमुळे राज्याला मोठा समृद्ध प्रदेश लाभला आहे. मात्र, राज्यातील सर्वात मोठी नदी कोणती? तुम्हाला माहितीये का?
गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. देशात गंगा नदीनंतर भारतातील दुसरी सर्वात लांब नदी गोदावरी आहे.
गोदावरी नदीची एकूण लांबी 1,465 किमी आहे. गोदावरी नदी ही भारतातील द्वीपकल्पीय नद्यांपैकी सर्वात मोठी नदी मानली जाते.
दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणार्या या नदीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व देखील आहे.
गोदावरी नदीचा उगम नाशिकमधील त्रंबकेश्वरमधून होतो. पाच राज्यासाठी गोदावरी नदी जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि ओडिसा या राज्यातून गोदावरी नदी वाहते.
महाराष्ट्रातून नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, गडचिरोली आणि नांदेड या आठ जिल्ह्यांतून गोदावरी वाहते.
उत्तरेकडून प्राणहिता, शिवना, कादवा, इंद्रावती, दक्षिण पूर्णा, दुधना या नद्या गोदावरीला मिळतात.
तर दक्षिणेकडील सिंदफना, मांजरा, प्रवरा, बिंदुसरा, दारणा या नद्या गोदावरीच्या उपनद्या आहेत.