व्हिटॅमिन बी 6ची कमतरता असल्यास शरीरात दिसतात ही लक्षणे

Jul 25,2024


व्हिटॅमिन बी 6 हा आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे. ज्यालाच पायरीडॉक्सिन देखील म्हणतात.


व्हिटॅमिन बी 6 हा मेंदूच्या आरोग्यामध्ये आणि कार्यामध्ये तसेच सेरोटोनिन आणि नॉरपेनेफ्रिनच्या उत्पादनामध्ये आढळते.

थकवा आणि कमी ऊर्जा

सतत थकवा आणि कमी उर्जा पातळी ही व्हिटॅमिन बी 6 ची लक्षणे आहेत.

मूड स्विंग

व्हिटॅमिन बी 6 च्या कमी पातळीमुळे चिडचिड आणि ताण येऊ शकतो.

स्नायू दुखणे आणि क्रांम्प

व्हिटॅमिन बी 6 च्या कमतरतेमुळे स्नायू दुखणे,क्रॅम्प आणि अशक्तपणा येऊ शकतो.

ओठांवर फोड येणे

फुटलेले ओठ हे तोंडाच्या कोपऱ्यात कमी व्हिटॅमिन बी 6 चे लक्षणे असू शकते.

कमकुवत रोगप्रतिकारशक्ती

व्हिटॅमिन बी 6 रोगप्रतिकारक शक्ती वाढवते ज्यामुळे अनेक आजार दूर होण्याची शक्यता असते.

अशक्तपणा

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी व्हिटॅमिन बी 6 महत्त्वाचे असते. व्हिटॅमिन बी 6च्या कमतरतेमुळं अशक्तपणा येऊ शकतो, ज्यामुळे चक्कर येणे आणि थकवा यासारखी लक्षणे दिसू शकतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story