संत्री खाण्याचे '6' फायदे

Jul 25,2024


संत्री हे हिवाळ्यातील फळ आहे जे स्वादिष्टच नव्हे तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतात.संत्रींमध्ये असलेले व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स सर्दी आणि इतर आजारांपासून बचाव करतात.

रोग प्रतिकारकशक्ती वाढवते

संत्रींमध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते आणि पांढऱ्या पेशीसुद्धा मजबूत करतात.

रोगांपासून बचाव

संत्र्यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि दाहक विरोधी गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे आजारांपासून संरक्षण होते.

पचन संस्था

संत्र्यामध्ये आढळणारे फायबर पचनसंस्था निरोगी ठेवते. त्याचप्रकारे बद्धकोष्ठतेपासून दूर राहण्यास मदत करते.

त्वचा आणि केस

संत्र्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडेंट त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज आणि फायबर वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असते.

कर्करोग प्रतिबंध

संत्र्यामध्ये असणारे अँटिऑक्सिडेंट कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story