आलं

आलं हे अॅण्टी इंफ्लेमेंट्री आणि अॅण्टी बॅक्टेरियल असतं. त्यामुळे पोट फुगणं आणि गॅससारख्या समस्यांपासून दिलासा मिळतो.

Apr 05,2023

ओवा

अनेकजण जेवणानंतर थोडा ओवा खातात. खरं तर एक ग्लास पाण्यामध्ये ओवा टाकून हे पाणी थंड करुन प्यायल्यास पोट फुगण्याची समस्या भेडसावत नाही.

केळी

केळ्यांमध्ये पोटॅशियम आणि फायबर असतात. जेवणानंतर केळ्यांचं सेवन केल्यानं अपचन आणि गॅसची समस्या दूर होते.

दही

दही हे एक प्रोबायोटिक्स आहे. दह्यामुळे पोटात अन्नपचनासाठी मदत करणाऱ्या बॅक्टेरियाला पोषण मिळतं. दह्यामध्ये मीठ टाकून सेवन केलं तरी फायद्याचं ठरतं.

बडीशेप

बडीशेपमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळेच जेवणानंतर बडीशेप खातात. बडीशेपचं सेवन केल्याने पोट फुगणं आणि गॅस दोन्ही समस्यांपासून आराम मिळतो.

लिंबू

जेवणानंतर लिंबू पाणी प्यायल्यास पोटासंदर्भातील अनेक समस्या दूर होतील. अपचनाची समस्याही लिंबाच्या सेवनाने कमी होते.

6 गोष्टींचा होईल फायदा

पण जेवणानंतरच काही ठराविक गोष्टींचं सेवन केलं तर या समस्या दूर होऊ शकते. या 6 गोष्टी कोणत्या ते पाहूयात...

अनेकांना असते समस्या

अनेकांना जेवणानंतर पोट फुगल्यासारखं वाटण्याची समस्या जाणवते. मात्र यावर त्यांना उपाय सापडत नाही.

VIEW ALL

Read Next Story