झोपेतून वारंवार जाग येते? मग 'हा' गंभीर आजार

बरेच लोक जेव्हा रात्री झोपतात त्यांना शांत झोप लागत नाही. त्यांना वारंवार जाग येते. तुम्हाला पण अशी समस्या असेल तर एका संशोधनानुसार वृद्धापकाळात तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतो.

संशोधनानुसार, ज्या लोकांना 30 आणि 40 व्या वर्षी झोपेचा त्रास असेल, तर त्यांच्या मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होतो. त्यांची स्मरणशक्ती कमकुवत होते.

अमेरिकन अकादमी ऑफ न्यूरोलॉजीच्या जर्नल न्यूरोलॉजीमध्ये हे संसोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. ज्यामध्ये 11 वर्षांपासून 526 लोकांवर हे संशोधन करण्यात आले.

ज्या लोकांना शांत झोप लागते, त्या व्यक्तींना 50 शीनंतर त्यांचे मेंदू चांगल काम करते आणि त्यांची स्मरणशक्तीही चांगली राहते.

डॉक्टरांनुसार एका व्यक्तीला सरासरी 7.25 तासांची झोप लागते पण ती वेगवेगळ्या लोकांसाठी कमी अधिक असू शकते.

सकाळी झोपेतून उठल्यावर त्यांना फ्रेश वाटलं तर याचा अर्थ त्यांची झोप पुरेशी झाली आहे.

झोपच्या कमतरतेमुळे आपण इतर अनेक समस्यांना बळी पडू शकतो. आरोग्य वेबसाइट हेल्थलाइनच्या अहवालानुसार पुरेशी झोप न घेतल्यास कर्करोग आणि मधुमेहासारखा आजार होऊ शकतो.

अपुऱ्या झोपेमुळे तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत होते. त्यामुळे वारंवार झोपेतून जाग येणे टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे गरजेच आहे.

नियमित व्यायाम, नृत्य, सायकलिंग, पोहणे यासारखे व्यायाम करावेत. त्याशिवाय झोपण्यापूर्वी फोन, टीव्ही सारखे इलेक्ट्रॉनिक गॅझेट बेडपासून दूर ठेवावे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story