मनुष्यांना रोज रात्री किमान 7 ते 8 तासांची घेणं गरजेचं आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, मनुष्यांसाठी झोप इतकी महत्वाची का आहे?
सेंट लुइसयेथील वॉशिंग्टन यूनिवर्सिटीच्या अभ्यासकांनी एक रिसर्च केला. झोप घेतली नाही तर तुम्ही मराल.
सेंट लुइसयेथील वॉशिंग्टन यूनिवर्सिटीच्या अभ्यासकांनी एक रिसर्च केला. झोप घेतली नाही तर तुम्ही मराल.
ऑफिस ऑफ डिजीज प्रीवेंशन अॅंड हेल्थ प्रोमोशननुसार, पुरेशी झोप घेतल्याने इम्यून सिस्टीम मजबूत होतं. याने छोट्या-मोठ्या इन्फेक्शनमुळे तुमचा जास्त आजारी पडण्याचा धोकाही कमी होतो.
झोप तुमच्या मेटाबॉलिज्मसाठी आवश्यक आहे. तुम्ही जे खाता ते ठीकपणे पचन होऊन शरीराला लागतं आणि फॅट कमी तयार होतं. लठ्ठपणापासून वाचवण्यासाठी हे फार महत्वाचं आहे.
झोप घेत असताना मेंदू रिलॅक्स होतो. जर झोप कमी झाली तर एंझायटी, आळस आणि डिप्रेशनचं कारण बनते. आनंदी आणि फ्रेश राहण्यासाठी रोज 7 ते 8 तास झोप घेणं गरजेचं आहे.
कमी झोप घेतल्याने हृदयरोग आणि डायबिटीसचा धोकाही वाढतो. आजारांच्या रूग्णांना झोप पूर्ण घेण्याचा सल्ला दिला जातो.
जे लोक पुरेशी झोप घेतात त्यांचा फोकस आणि प्रोडक्टिविटी चांगली आढळून आली आहे. झोप घेतली नाही तर तुम्हाला आळस आणि कमजोरी जाणवू शकते.