रंजक इतिहास

Pune Shaniwar Wada : बाजीराव पेशव्यांनी कशी निवडली शनिवार वाड्याची जागा? वाचा रंजक इतिहास

Jan 18,2024

पेशवाईची भरभराट,

या शनिवार वाड्यानं पेशवाईची भरभराट, उदय, अस्त, नात्यांचे बंध आणि कटुता पाहिली. अनेक लढायांचे विजय पाहिले, पानिपताचा पराभव पचवला. कटकारस्थानं, कावेबाजपणा, पाहुण्यांचा पाहुणचार, कार्यक्रमांची रेलचेल, आनंद, दु:ख, विश्वासघात, पेशव्यांच्या जीवनातील अखेरचे दिवस पाहिले.

कथा

शनिवार वाड्याची जागा नेमकी कशी निवडली गेली, याबद्दल एक आख्यायिकावजा कथा सांगण्यात येते. वाडा उभारण्याआधी त्यासाठी जागा शोधत असताना श्वानाचा पाठलाग करणारा ससा पहिल्या बाजीराव पेशव्यांना दिसला.

गोष्ट महत्त्वाची

हा लहानसा भित्रा प्राणी चक्क श्वानालाही भयभीत करतोय हे पाहून ही जागात शौर्याचं प्रतीक असावी असा कयास बाजीरावांनी बांधला आणि ही जागा शनिवार वाड्यासाठी पसंत करण्यात आली. जिथं आजही त्याचं भलमोठं प्रवेशद्वार पाहता येतं.

पायाभरणी

शनिवार वाड्याची पायाभरणी शके 1651 मध्ये माघ महिन्यात शुक्ल पक्षात तृतीयेच्या दिवशी झाली. उपलब्ध माहितीनुसार या दिवशी 10 जानेवारी 1730 अशी तारीख असून, शनिवार होता.

वास्तूशांती

वाडा बांधून झाल्यानंतर त्याची वास्तूशांतीसुद्धा 22 जानेवारी 1732 रोजी झाली, तो दिवसही शनिवारच होता. ज्यामुळं या वाड्याला शनिवार वाडा असं नाव पडल्याचं सांगितलं जातं.

मुख्य इमारत

काही ऐतिहासिक लेखांमध्ये उल्लेख असल्यानुसार वाड्याची मुख्य इमारत सहा मजली होती. शनिवार वाड्याला 5 दरवाजे होते. दिल्ली दरवाजा, गणेश दरवाजा, मस्तानी दरवाजा, कवठी दरवाजा आणि जांभूळ दरवाजा अशी त्यांची नावं.

10 चौक

वाड्यात असणाऱ्या 10 चौकांपैकी 4 चौक मोठे होते. शनिवार वाड्यामध्ये नृत्य महाल, दिवाणखाने आणि शीशमहालही होते. असा हा शनिवार वाडा आजही इतिसाहासाची आणि पेशवाईची साक्ष देतोय...

VIEW ALL

Read Next Story