शरिराला आतून पोकळ बनवते सकाळी केलेली 'ही' एक चूक, आयर्न लेव्हलही घसरते

Shivraj Yadav
Sep 02,2024

आपल्याकडे अनेकांना बेड-टीची सवय आहे. म्हणजे दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीशिवाय होत नाही.

पण सकाळी उपाशीपोटी चहा-कॉफीचं सेवन करणं किती धोकादायक आहे याची जाणीव तुम्हाला आहे का?

सकाळी उठताच चहा किंवा कॉफी पिणं आरोग्यासाठी धोकादायक आहे. असं केल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

सकाळी रिकाम्यापोटी चहा किंवा कॉफीचं सेवन केल्याने पोटात अॅसिड तयार होतो. ज्यामुळे हार्टबर्न, ब्लोटिंग आणि पोटाच्या अल्सरची समस्या होतात.

कॅफीनयुक्त चहा किंवा कॉफीचं सेवन केल्याने तोंड आणि पोटातील बॅक्टेरिया बाहेर निघू शकत नाहीत. ज्यामुळे पचन आणि मेटाबॉलिजम यावर प्रभाव पडतो.

तसंच डिहायड्रेशची समस्याही होऊ शकते. चहा ड्युरेटिक असल्याने तो प्यायल्याने वारंवार लघुशंका होऊ शकते.

सकाळी रिकाम्यापोटी चहा घेतल्याने शरिराचा योग्य प्रकारे नीट विकास होत नाही. चहामध्ये टेनिन असतं जे आयर्न आणि इतर पोषणतत्वांना अडथळे निर्माण करतं.

ICMR नुसार, जेवणाच्या एक तास आधी आणि नंतर चहाचं सेवन करु नये.

ICMR नुसार, चहा आणि कॉफीत कॅफीन असतं जे सेंट्रल नर्व्हस सिस्टमला उत्तेजित करतं.

VIEW ALL

Read Next Story