देसी गर्ल प्रियंका चोप्रा ही सातत्याने या ना त्या कारणाने चर्चेत असते.
प्रियंका सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून अनेकदा ती तिच्या फोटोशूटबरोबरच भटकंतीचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
प्रियंका पती निक जोनासबरोबचेही अनेक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करताना दिसते.
इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या भारतीयांच्या यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या प्रियंकाच्या पोस्टवर लाखोंच्या संख्येनं लाईक्स अन् कमेंटचा पाऊस पडतो.
मात्र सध्या प्रियंका तिच्या पतीने म्हणजेच निक जोनासने एका कार्यक्रमातील फोटो शेअर केल्याने चर्चेत आहे.
निक जोनासने एका लग्न सोहळ्यातील खास फोटो शेअर केले. यामध्ये तो त्याच्या काही मित्रांसोबत पिंक सूटाबुटात दिसत आहे.
निकने प्रियंकासोबतचेही काही फोटो या पोस्टमध्ये शेअर केले असून प्रियंका ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत आहे.
प्रियंकाने परिधान केलेल्या या काळ्या रंगाच्या ड्रेसची किंमत इतकी आहे की यामध्ये सर्वसामान्यांचे अनेक महिन्यांच्या कर्जाचे हफ्ते फेडले जातील.
प्रियंकाने परिधान केलेला हा ड्रेस डेव्हीड कोमा या डिझायनरने डिझाइन केला आहे. स्प्रींग 2024 कलेक्शनमधील या ड्रेसची किंमत तब्बल 2 लाख रुपये इतकी आहे.