भगवान शंकरांना श्रावण हा महिना अत्यंत प्रिय आहे, म्हणूनच शिवभक्त श्रावणातील सोमवारी महादेवांची उपासना करतात.
शिव हा संयम आणि त्यागाचं देखील प्रतिक आहे. ज्याला पाहून मन:शांती मिळते असा हा योगी म्हणून महादेवांना 'आदियोगी' असं म्हटलं जातं.
शिव ध्यानाला जसं धार्मिक महत्त्व आहे तितकंच शास्त्रीय कारण देखील आहे.
जीव आणि शिव हे एकच आहे. त्यामुळे प्रत्येक अंतराम्यात शिव वास करतो असं म्हटलं जातं. म्हणून शिव ध्यान केल्याने मानसिक ताण तणाव दूर होतात.
बऱ्याचदा आयुष्यातील वेगवेगळ्या समस्यांमुळे किंवा नातेसंबंध खराब असल्याने अनेकजण नैराश्यात जातात.
मानसिक नैराश्यामुळे बऱ्याचदा चुकीचे निर्णय घेतले जातात.यासगळ्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन आयुष्यावर होतो.
शिव ध्यानामुळे मानसिक नकारात्मकता कमी होते. म्हणूनच ध्यानसाधना करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
शिव ध्यानामुळे फक्त ताण तणाव नाही तर मणक्याशी आणि पाठीच्या संबंधित आजार दूर होण्यास मदत होते.
शिव ध्यानामुळे मनाची चंचलता कमी होते.
शिव ध्यान करण्यासाठी ताठ बसा. त्यानंतर डोळे बंद करा आणि पोटातून श्वास घ्या.
शिव ध्यानामुळे श्वसनाशी संबंधित आजारही दूर होण्यास मदत होते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)