उन्हाळ्यात कॉटनची ब्रा वापरावी. त्या आरामदायी असतात. कपडे असो किंवा ब्रा एकच फॅब्रिक निवडा जेणेकरून त्वचेलादेखील मोकळा श्वास घेता येईल.

स्तनांना सूज किंवा पू, संसर्ग असेल तर ब्रा घालू नका. या समस्या 1-2 दोन दिवसांत दूर होतात, पण स्तनात गाठी, कर्करोग असेल तर ब्रा घालायला हरकत नाही.

ब्रा वापरली नाही, तर स्तनाचे आजार होतात, असे कोणत्याही अभ्यासात समोर आलेले नाही, मात्र वयानुसार त्वचा आणि शरीराच्या काही भागात बदल होतात, त्याप्रमाणे स्तनही सैल होतात, त्यामुळे त्यांना आधार देण्यासाठी ब्रा वापरणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला पॅडेड किंवा अंडरवायर ब्रा आरामदायी वाटत असतील तर ती घाला, मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती व्यवस्थित फिट आणि कंफर्टेबल असावी.

ब्रा खरेदी करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती आरामदायी असायला हवी. ती खूप घट्ट किंवा खूप सैल नसावी. काही महिला रात्री खूप सैल ब्रा घालून झोपतात, जे योग्य नाही.

जर स्त्रिया रात्रीच्या वेळी ब्रा उतरवून किंवा घालून झोपतात तर दोन्ही बाबतीत शरीराला कोणतेही नुकसान होत नाही. आतापर्यंत असे कोणतेही संशोधन समोर आलेले नाही की ब्रा बंद करून झोपल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो किंवा वाढतो.

महिलांच्या मनात ब्रा घालून झोपण्याविषयी अनेक गैरसमज आहेत. रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपणे योग्य आहे की अयोग्य आहे...

VIEW ALL

Read Next Story