हिमालयात आढळणारा शिलाजीत हा एक नैसर्गिक पदार्थ अनेक शतकांपासून आयुर्वेदामध्ये वापरला जातो.चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करून त्वेचेला टवटवीत करते.
शिलाजीतमध्ये नारळाचं किंवा बदामाचं तेल मिसळून चेहऱ्यावर लावल्यास सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
शिलाजीतमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे त्वचा तरूण आणि मुलायम राहण्यास फायदेशीर ठरते.
शिलाजीतचं नियमित वापर केल्याने कोलेजनचे प्रमाण वाढते. यामुळे त्वचेची लवचिकता टिकून राहते आणि सुरकुत्यादेखील कमी होतात.
शिलाजीत त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवते. ज्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते त्यामुळे सुरकुत्या पडण्याची शक्यता कमी असते.
नॅशनल इन्सिटट्यूट ऑफ हेल्थच्या अभ्यासानुसार शिलाजीत चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.त्यामुळे त्वचेची लवचिकता सुधारण्यास देखील मदत होते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)