Food Habits : शरीराला पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी अनेकदा काही पदार्थांचं सेवन करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.
मांस, मासे आणि अगदी अंड्यांचाही आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. पण, हे पदार्थ कोणी खात नसेल तर?
आहारजत्ज्ञांच्या मते मांस, अंडी न खाणाऱ्यांसाठी चवळी हे कडधान्य एक उत्तम पर्याय आहे.
चवळीच्या सेवनामुळं शरीराला मुबलक प्रमाणात प्रोटीनचा पुरवठा केला जातो.
दर 100 ग्रॅम चवळीमध्ये 25 ग्रॅम प्रोटीन असतं. शिवाय यामध्ये विटामिन, खनिज, मँगनीज, प्रोटीन, कॅल्शियमसारखे घटकही आढळतात.
चवळी ही एक उत्तम अँटीऑक्सिडेंट असून, त्यामुळं हाडं आणि मांसपेशींना बळकटी मिळते.