'या' 5 सवयीने नात्यात दुरावा, लैंगिक जीवनात अडथळा

नात्यात दुरावा

Sexual health : अनेक कारणांनी आपल्या नात्यात दुरावा येतो. मात्र, ही पाच कारणेही जोडीदारांच्या नात्यात दुरावा येण्यासाठी पुरेशी आहेत. त्यामुळे या पाच सवई सोडून दिल्या तर नाते फुलेल आणि नात्यात गोडवा राहिल.

वाईट सवयी

Sexual Health Tips: आपल्या जीवनातील काही वाईट सवयी पुरुषांमध्ये कामवासना कमी होण्यास कारणीभूत आहेत. या सवयी सोडल्या तरच वैवाहिक जीवनातील अनेक समस्या सुटू शकतात.

अनेक अडथळे

असे सांगितले जाते की, सुखी वैवाहिक जीवनाची प्रमुख गुरुकिल्ली म्हणजे लैंगिक जीवन. मात्र अलीकडे त्यात सर्व प्रकारचे अडथळे येत आहेत.

पाच वाईट सवयी

प्रीमॅच्युरिटीच्या समस्यांमधून उत्तेजना नसल्याबद्दल गुंतागुंत होते. तसेच शुक्राणूंच्या कमतरतेमुळे गर्भधारणेत गुंतागुंत निर्माण होते. पण यासाठी रोजच्या पाच सवयी मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहेत

जास्त वजन

जास्त वजन ही सामान्य समस्या असली तरी त्याचा परिणाम हा लैंगिक समस्येवर दिसतो. योग्य वेळी उत्तेजना न मिळाल्याने शुक्राणूंची कमतरता आणि शीघ्रपतन यांसारख्या समस्या वाढतात. त्यामुळे सर्वप्रथम वजनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

पोषक तत्वांचा अभाव

रोजच्या अन्नात पोषक घटकांचे प्रमाण किती आहे याकडे लक्ष द्या. आले, लसूण, खजूर, बदाम यासारखे पदार्थ लैंगिक शक्ती वाढविण्यास मदत करतात. तसेच रोजच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण पुरेसे असावे.

ताणतणाव

कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच चिंताही वाढत आहे. त्यामुळे सेक्स करण्याची इच्छा खूप कमी होते. पुरेशी इच्छा नसल्यास पार्टनर असमाधानी राहतो. त्यामुळे रोजच्या कामात तुम्हाला बरे वाटेल अशा कामांमध्ये स्वतःला गुंतवून घ्या.

झोपेचा अभाव

तुम्ही झोपेबाबत तडजोड करु नका. एवढेच नाही तर दिवसभरात कमी झोप घेतल्याने शरीरावर वाईट परिणाम होण्याचा धोकाही असतो. त्याच वेळी, लैंगिक जीवन विस्कळीत होते. त्यामुळे दररोज सहा ते सात तास झोप हवीच.

धूम्रपान आणि मद्यपान

धूम्रपान आणि मद्यपान हे लैंगिक जीवनातील प्रमुख अडथळे आहेत. या दोन कारणांमुळे लैंगिक शक्ती खूप कमी होते. धूम्रपान आणि मद्यपान केल्याने कोर्टिसोल हार्मोनचा स्राव वाढतो. त्यामुळे लैंगिक क्षमता कमी होते.

VIEW ALL

Read Next Story