माथेरान आणि माळशेज घाट येथील निर्गाच्या प्रेमात पडाल. उंचावरुन कोसळणारा धबधबा आपल्याला आकर्षत करतो. त्यामुळे पावसाळ्यात याठिकाणी जाऊन आपल्या जोडीदारासोबत चिंब भिजण्याचा आनंद काही औरच असतो. मुंबई, पुणे आणि ठाणे येथून वीकेंडला जाण्यासाठी माळशेज घाट नक्कीच एक लोकप्रिय ठिकाण ठरत आहे.
रायगड जिल्ह्यातील माथेरान या हिल स्टेशन. माथेरान हे जोडप्यांसाठी पावसाळ्यात फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे, तुम्हाला एकत्र निवांत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि तुम्ही ताजेतवान व्हाल.
माळशेज घाटातील नैसर्गिक ठिकाणी पिंपळगाव जोगा धरण सुद्धा तुम्ही पाहू शकता. तसेच याठिकाणी तुम्हाला फ्लेमिंगो, ग्रीन कबूतर, अल्पाइन स्विफ्ट यांसारख्या दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात.
अप्रतिम आणि सुंदर नैसर्गिक दृश्यांनी वेढलेले हे छोटेसे हिल स्टेशन पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करते.
माथेरानमध्ये वर्षभर पर्यटकांची ये-जा सुरुच असते, पण पावसाळ्यात जणू या हिल स्टेशनवर हिरवाईची चादर असते. पावसाळ्यात माथेरानचा हा संपूर्ण परिसर धुक्याने व्यापलेला असतो, ज्यामुळे त्याचे सौंदर्य अनेक पटींनी वाढते.
माथेरानमध्ये टॉय ट्रेनचा प्रवास खूप लोकप्रिय आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवण्यासाठी शांत जागा शोधत असाल तर माथेरान तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.
माथेरानमधील इको पॉइंटवर उभे राहून तुम्ही तुमच्या पार्टनरचे नाव घेऊन आवाज दिलात तर त्याचा प्रतिध्वनी येतो. तसेच पावसाळ्यात माथेरानच्या या पॉइंटचे सौंदर्य येथील धबधब्यांमुळे अनेक पटींनी वाढते.
महाराष्ट्रातील अंबरनाथ मंदिरात भगवान शिवाची पूजा केली जाते. शिलाहाटचा राजा मंबानी याने 1060 मध्ये बांधला होता असे सांगितले जाते.
माथेरानच्या सुंदर दऱ्या, वाहणारे धबधबे आणि स्वच्छ हवा पर्यटकांना पुन्हा पुन्हा इथे येण्याचे आमंत्रण देतात.