सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून सारा अली खानकडे पाहिलं जातं. सोशल मीडियावर तिच्या अनेक फोटोंवर चाहते तिच्या सौंदर्याचं कौतुक करताना दिसतात.
अभिनेत्री सारा अली खानने नुकताच एक आश्चर्यकारक खुलासा केला. हा खुलासा तिने सणासुदीच्या काळात वजन वाढल्यानंतर ते कसं कमी केलं यासंदर्भात केला आहे.
साराने अवघ्या 2 आठवड्यांमध्ये पोटाजवळची चरबी म्हणजेच बेली फॅट कमी केलं आहे. फिटनेससाठी तिने नेमकं काय केलं याबद्दल जाणून घेऊयात...
साराला पीसीओडीचा त्रास होता. त्यामुळे अभिनयामध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने तिला वजन कमी करणं आवश्यक होतं.
वजन कमी करण्याच्या उद्देशानेच साराने नियंत्रित आणि संतुलित लाईफस्टाइल सुरु केली.
साराच्या व्यायामामध्ये चालणे, सायकलिंग आणि ट्रेडमिल वर्कआऊटचा प्रामुख्याने समावेश होता. हा कार्डिओ बेस व्यायाम म्हणून ओळखला जातो.
या व्यायामामुळे साराला चरबी कमी करण्यास मदत होण्याबरोबरच पुढील व्यायामप्रकारासाठी तयार होण्यास मदत झाली.
Pilates म्हणजेच शरीर जास्तीत जास्त स्ट्रेच करणारे व्यायाम हे साराच्या दैनंदिन व्यायाम प्रकाराचा अविभाज्य भाग झाले. यामुळे तिचा स्टॅमिना वाढला.
सारा व्यायामादरम्यान स्वत:ला उत्साहित ठेवण्यासाठी म्युझिकचीही मदत घ्यायची. ती आजही गाणी ऐकत व्यायाम करते.
सारा योग अभ्यास आणि बॉक्सिंगच्या माध्यमातूनही शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा समतोल राखते.
साराने इन्स्टाग्रामवर डॉक्टर सिद्धांत भार्गव यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या प्लॅटफॉर्मच्या मदतीने साराला हा वजन कमी करण्याचा प्रवास सुसाह्य झाला.
व्यायामाधील सातत्य आणि योग्य दिवशी आराम असा समतोल राखून साराने केलेल्या व्यायामाचा तिला फार फायदा झाला.
याच व्यायामाच्या मदतीने साराला सणासुदीच्या काळात वाढलेलं वजन कमी करण्यासाठी फायदा झाला आणि 2 आठवड्यामध्ये पोटाजवळची चरबी तिला कमी करता आली.
साराने केलेला हा व्यायाम डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केला आहे. त्यामुळे तुम्हीही व्यायाम करण्याचा विचार करत असाल तर आधी तज्ज्ञांचा, डॉक्टरांचा सल्ला घ्या.