सीतारामण कडाडल्या!

'मुस्लिम देशांवर बॉम्बहल्ले करणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये'

सीतारामन म्हणतात...

बराक ओबामांमुळे सहा मुस्लिमबहुल देशांवर बॉम्बस्फोट झाले. पंतप्रधान मोदी जेव्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर होते, तेव्हाच अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी भारतीय मुस्लिमांबद्दल वक्तव्य करणं, हे आश्चर्यकारक आहे, असं सीतारामन म्हणाल्या आहेत.

जबाबदारपणे बोलतीये

मी अत्यंत जबाबदारपणे बोलत आहे. आम्हाला अमेरिकेशी चांगले मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे आहेत. ओबामा भारतातील धार्मिक सहिष्णुतेवर टिप्पण्या करत आहेत. तुमच्या कार्यकाळात देशांवर बॉम्बस्फोट झाले नाहीत का? असा सवाल सीतारामन यांनी विचारला आहे.

२६ हजार बॉम्ब

सात देशांमध्ये युद्धाजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या देशांत २६ हजार बॉम्ब टाकले होते, असे नेते आता भारताच्या धार्मिक सहिष्णुतेवर भाष्य करतात, असं म्हणत सीतारामन यांनी ओबामा यांना टोला लगावला.

कोण गांभीर्यानं घेणार?

ओबामा यांच्या वक्तव्याला कोण गांभीर्यानं घेणार? असा सवाल देखील सीतारामन यांनी विचारला आहे.

मुलाखत

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला होता. जर मोदींशी चर्चा करण्याची संधी मिळाली तर ते भारतातील मुस्लीम अल्पसंख्याकांच्या हक्कांवर चर्चा करतील, असं ओबामा म्हणाले होते.

मानवी अधिकार संरक्षित

मुस्लिमांचे मानवी अधिकार संरक्षित करण्यासाठी तुम्ही काय पावलं उचलत आहात, असं मी मोदींना विचारेन, असंही ओबामा म्हणाले होते.

VIEW ALL

Read Next Story