जेवणात वरून जास्तीचं मीठ न टाकण्याचा सल्ला दिला जातो खरा. पण, मिठाचं पाणी पिण्याचे फायदे माहितीयेत?
मिठाच्या पाण्यामुळं पचनक्रिया सुधारुन शरीरातील अनेक अवयवांची कार्यक्षमता वाढते.
मिठाचं पाणी प्यायल्यामुळे शरीराला लगेचच उर्जा मिळते. या पाण्यामुळं शरीर कायम थंड राहतं.
मिठाचं पाणी प्यायल्यामुळं शरीराला कॅल्शियमचा पुरवठा होऊन हाडांना बळकटी मिळते.
मिठाच्या पाण्यात असणारे इलेक्ट्रोलाईट शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवतात, शिवाय त्वचेचा पोत सुधारतो.
मिठाचं पाणी कफ मोकळा करण्यासाठी, सूज कमी करण्यासाठी आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी मदत करतं. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)