दूध जर बाहेर ठेवलं तर ते नासण्याची भीती असते. खासकरुन उन्हाळ्यात ही समस्या जाणवते. त्यामुळे दूध वारंवार गरम करावं लागतं.
अनेकदा दूध फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही खराब होतं. याचं कारण आपण दूध योग्य ठिकाणी ठेवलेलं नसतं.
दरम्यान, एक्स्पर्टनुसार फ्रिजमध्ये अशी एक जागा आहे जिथे दूध ठेवल्यास ते खराब होत नाही.
अनेक लोक फ्रिजमध्ये अगदी समोरच दूध ठेवतात. अशा स्थितीत फ्रिज खोलला असता थंड हवा लगेच बाहेर निघून जाते.
यामुळे त्याच्यातील ताजेपणा कमी होतो, त्यामुळे दूध खराब होण्याची शक्यता वाढते.
दूध फ्रिजमध्ये नेहमी मागील बाजूला ठेवा.
यामुळे दूध फार काळासाठी फ्रेश राहतं.
दूधाला फ्रिजमध्ये चिलरजवळच ठेवा.
तसंच फ्रिज फार काळासाठी उघडा ठेवू नका असाही सल्ला दिला जातो.