व्यायामानंतर तुम्ही हाय कॅलरी ड्रिंक्स टाळल्या पाहिजेत. वजन वाढण्यामागे याचा फार मोठा वाटा असतो.
सकाळी नाश्ता करताना त्यात आरोग्यदायी पदार्थ असतील याकडे कटाक्षाने लक्ष द्यावं. नूडल्स, बर्गर किंवा एअरेटेड सॉफ्ट ड्रिंक्ससारख्या गोष्टी टाळाव्यात.
अल्कोहोलमध्येही अतिरिक्त कॅलरीज असतात. यामुळेही वजन वाढतं. त्यामुळे जमेल तितकं अल्कोहोलचं सेवन टाळावं.
व्यायाम करताना जास्त कार्डिओ केल्याने शरीराची घनता वाढण्याची शक्यता असेत. त्यामुळे मेटाबायोलिक प्रोसेसवर परिणाम होतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी वेट लिफ्टींगवरही लक्ष केंद्रीत केलं पाहिजे.
व्यायाम झाल्यानंतर तुम्ही हाय कॅलरी डाएट घेत असाल तर तुमचं वजन कमी होणार नाही. व्यायामानंतर तुम्ही कामीत कमी कॅलरी असणारे पदार्थ खाल्ले पाहिजे.
तुम्ही उशीरा झोपत असाल आणि उशीरा उठत असाल तर तुमचं वजन वाढू शकते. त्यामुळेच रोज किमान 8 तासांची झोप घ्यावी यामुळे दिवसभर मन आणि शरीर उत्साही राहतं.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कॅलरीज फार महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळेच डाएट चार्टमध्ये तुम्ही सेवन करत असलेल्या पदार्थांमधील कॅलरीचा हिशोब ठेवला पाहिजे.
तुम्हालाही हा अनुभव आला असेल तर यामागे काही खास कारणं असू शकतात ती कोणती जाणून घेऊयात..
वजन कमी करण्यासाठी तुम्ही रोज व्यायाम करत आहात, मात्र तुमचं वजन कमी होत नाही?