शारीरिक हालचालींद्वारे धूम्रपान करण्याची इच्छा कमी होते. तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित केल्याने धूम्रपानाची क्रेविंग कमी होऊ शकते.
जर तुम्हाला सिगारेटचे व्यसन सोडायचे असेल तर ते वातावरण आणि कंपनी टाळा, जिथे तुम्हाला पुन्हा सिगारेट ओढावीशी वाटते.
स्वत:साठी एक डेडलाइन निश्चित करा. त्यानंतरही धुम्रपान करण्याची इच्छा असल्यास दीर्घश्वास घ्या आणि पाणी प्या. असे केल्याने तुमचे लक्ष सिगारेटवरून विचलित होईल.
तुमच्या करिअरवर, कुटुंबावर, मुलांवर किंवा तुमच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करा. धुम्रपान सोडण्याचा तुमचा दृढनिश्चय बळकट करण्यात तुम्हाला मदत होईल.
सकाळी उठल्यावर 2 ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून त्यात मध टाकून प्यायल्याने सिगारेटचे व्यसन सुटू शकते.
बडीशेप हा धूम्रपान सोडण्याचा सर्वात प्रभावी घरगुती उपाय आहे. जेव्हा तुम्हाला सिगारेट ओढावीशी वाटेल तेव्हा थोडी बडीशेप खा.
डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर निकोटीन रिप्लेसमेंट घेतल्यासही सिगारेटचे व्यसन सोडण्यास मदत होईल.