जीव धोक्यात टाकताय...

फळं, भाज्या किंवा इतर गोष्टी चिरण्यासाठी चॉपिंग बोर्ड वापरताय? जीव धोक्यात टाकताय...

चॉपिंग बोर्ड

स्वयंपाकघरांमध्ये हमखास दिसणारी एक गोष्ट म्हणजे चॉपिंग बोर्ड, किंवा फळं, भाज्या, मासे, मांस कापण्यासाठी वापरण्यात येणारा एक फळीवजा बोर्ड.

धोकादायक

घराघरांमध्ये आहा हा चॉपिंग बोर्ड दिसणं अतिशय सर्वसामान्य बाब झाली आहे. पण, तुम्हाला माहितीये का तो तुमच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे.

प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड

प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड वापरत असताना नकळतच कोणतीही गोष्ट चिरत असताना त्या बोर्डावरून प्लास्टिकचे सूक्ष्म कण निघतात आणि चिरून ठेवलेल्या पदार्थांवाटे पोटात जातात.

हार्मोन्सवर परिणाम

प्लास्टिकचे हे कण पोटात गेल्यास त्याला हार्मोन्सवर परिणाम होतो. जाणून थक्क व्हाल, पण प्लास्टिकच्या चॉपिंग बोर्डमधून दर वर्षी 50 ग्राम प्लास्टिकचे सूक्ष्म कण निघतात.

वापर टाळलेलाच बरा

थोडक्यात प्लास्टिकच्या चॉपिंग बोर्डचा वापर टाळलेलाच बरा. त्याऐवजी तुम्ही लाकडाच्या बोर्डचा वापर सर्रास करु शकता.

लाकडी चॉपिंग बोर्डचा वापर

चांगली Finish असणाऱ्या या लाक़डी चॉपिंग बोर्डचा वापर केल्यास तो दीर्घकाळही टीकतो आणि त्यामध्ये नैसर्गिक घटक असल्यामुळं पदार्थांसोबतच मानवी शरीरालाही कोणतीच हानी पोहोचत नाही. (माहिती सौजन्य- @olivercareco / Video)

VIEW ALL

Read Next Story