प्रत्येकाला आपण तरुण दिसावं असं वाटत असतं,त्यात काही गैर नाही.

Nov 10,2023


वाढते वय चेहऱ्यावर दिसू नये यासाठी सगळ्याजणी काही ना काही उपाययोजना करताना दिसतात.


आपल्या त्वचेचं तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी आहारात एन्टी एजिंग फळांचा समावेश करायला हवा.


तुमच्या या प्रयत्नात या टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील.

ऍव्होकॅडो

ऍव्होकॅडो मध्ये व्हिटॅमिन K,C,E,Bआणि Aचे प्रमाण जास्त असल्यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा नष्ट होऊन नवीन त्वचा तयार होते. दुपारच्या जेवणानंतर ऍव्होकॅडो खावे.

संत्री

संत्र्यामध्ये पोषकतत्व इतर फळांच्या तुलनेत जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचा तजेलदार होते. दुपारच्या वेळेस संत्र खावं त्यामुळे त्वचा जास्त स्वस्थ राहते.

पपई

पपईमध्ये जीवनसत्त्व आणि खनिजे चांगल्या प्रमाणात असतात.पपईमध्ये पॅपेन एंजाइम असते. जे त्वचेच्या मृत पेशींची समस्या दूर करते.

किवी

त्वचा निरोगी आणि मुलायम ठेवण्यासाठी किवी उपयुक्त ठरतं. तसंच त्यात अॅंटी एजिंग गुणधर्मही आहेत.

द्राक्ष

द्राक्षांमध्ये रेझवेराट्रोल नावाचा घटक असतो,रेझवेराट्रोलमध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. त्यामुळे आपली त्वचा निरोगी आणि तरुण राहते.

VIEW ALL

Read Next Story